फैजपूर शहरातील समस्यांबाबत आमदार अमोल जावळे यांना साकडे
फैजपूर (2 डिसेंबर 2024) : रामराज्य सेवाभावी संस्थेतर्फे आठवडे बाजारातील तीन-चार वर्षांपासून सुरू होण्याच्या बहू प्रतीक्षेत असलेल्या सुलभ शौचालयाचा प्रश्न तसेच शहरातील पथदिवे बंद, गटारी स्वच्छता आदी मूलभूत समस्यांबाबत नवनिर्वाचित आमदार अमोल जावळे यांची शिष्टमंडळाने भेट घेत समस्या सोडवण्याची मागणी केली. आमदार जावळे यांनी नगरपालिकरा प्रशासनातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून नागरि मूलभूत समस्या ततकळ सोडवून नगरपालिकेत तक्रार नोंदवही ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. नगरपालिका प्रशासक तथा फैजपूर प्रांतधिकारी बबनराव काकडे उपस्थित होते.
अधिकारी, कर्मचार्यांच्या जाणल्या अडचणी
नगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधून साधून त्यांच्या अडचणी जाणण्यात आल्या तसेच आठवडे बाजारातील सुलभ शौचालय, स्वामी समर्थ केंद्र, ज्येष्ठ नागरिक संघासमोरील व श्रीकृष्ण नगरातील गटारीतील रस्त्यावर आलेले सांडपाणी, बंद पथ दिवे, आरोग्य फवारणी, शहरातील नियमित स्वच्छतेची समस्या तत्काळ मार्गी लावावी, अशा सूचना आमदारांनी केल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपाचे जिल्हा कार्यालयीन मंत्री गणेश माळी, माजी उपगराध्यक्ष हेमराज चौधरी, माजी नगरसेवक केतन किरगे, संजय महाजन, रावेर माजी नगरसेवक सुरज चौधरी, नितीन राणे, रामराज्य सेवा संघाचे संजय सराफ, निलेश चौधरी, निलेश कोल्हे, नगरपालिकेचे ओएस संगीता बाक्षे, सॉनिटरी अधिकारी लक्ष्मण चिरावन्डे, इजिनिअर ऋतुजा पाटील, प्रविण सपकाळे आदी अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते




