शेतीच्या वादातून जानवे गावात मुंबई पोलीस दलातील कर्मचार्‍याला मारहाण


अमळनेर (3 डिसेंबर 2024) : शेती वादावरून पोलिसाला सख्खा भाऊ आणि पुतण्याने मारहाण केल्याची घटना जानवे येथे घडली.

असे आहे नेमके प्रकरण
मुंबई पोलीस दलातील गुरुदास अर्जुन पाटील (52, जानवे) हे 30 रोजी त्यांच्या वडिलोपार्जित शेतीत रोटा व्हेक्टर मारण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले असता त्यांच्या भाऊने ट्रॅक्टर पुढे येऊन शिवीगाळ करत धमकी दिली. तसेच त्याने हातातील लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने गुरुदास यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले. पुतण्या कल्पेश चंद्रकांत पाटील याने देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांनी भांडण आवरले.

चंद्रकांत पाटील याने ठार मारण्याची धमकी दिली होती. यामुळे दवाखान्यातून उपचार घेऊन घरी आल्यावर गुरुदास पाटील यांनी अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून चंद्रकांत पाटील व कल्पेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार कैलास शिंदे करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !