शिरपूरातील घरफोडीची उकल : आरोपी शहर पोलिसांच्या जाळ्यात
74 हजारांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
Shirpur burglary solved : Accused nabbed by city police शिरपूर (6 जुलै 2026) : शिरपूर शहर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात स्थानिक आरोपीला अटक करीत 74 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. रवीद्र राजेंद्र पवार (रा.खुर्दे बुद्रुक, ता.शिरपूर, जि.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
काय आहे प्रकरण
शिरपूर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार, 1 जुलै 2026 रोजी रात्री 10.45 ते 2 जुलै 2026 रोजी दुपारी 12 दरम्यान तक्रारदाराच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. यावेळी घरातून एलईडी टीव्ही, एसी आणि दोन लॅपटॉप असा एकूण 74 हजारांचा ऐवज चोरीस लांबवण्यात आला व शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला..
डी.बी. पथकाले गोपनीय माहितीद्वारे रवींद्र राजेंद्र पवार (रा.खर्दे बुद्रुक, ता.शिरपूर, जि.धुळे) यास अटक केली व त्याने घरफोडीची कबुली दिली. आरोपीकडून चोरीस गेलेला एलईडी टीव्ही, एसी व दोन लॅपटॉप असा एकूण 74 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, अंमलदार रवींद्र आखडमल, अतुल पाटील, विनोद आखडमल, भटू साळुंके, गोविंद कोळी, मनोज दाभाडे, सचिन वाघ, प्रशांत पवार, मनोज महाजन, योगेश दाभाडे, सोमा ठाकरे, आरीफ तडवी, होमगार्ड मिथून पावरा आदींच्या पथकाने केली.