आमदार अमोल जावळे यांच्या सुचनेवरून यावल शहरात स्वच्छता
शहरात दाखल होणार्या सर्वच रस्त्यावर स्वच्छता अभियान
यावल (6 डिसेंबर 2024) : शहरात दाखल होतांना अंकलेश्वर-बर्हाणपूर राज्य मार्ग तसेच भुसावळ रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. आमदार अमोल जावळे यांनी या बाबत नगरपालिकेला स्वच्छतेच्या सुचना केल्या व नगरपालिकेने विशेष स्वच्छता मोहिम सुरू करीत सर्वत्र स्वच्छता केली आहे. शहराच्या सभोवतालच्या भागात स्वच्छता केल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त केली जात आहे.
आमदारांच्या सूचनेची दखल
नगर परिषदेच्या वतीने आमदार अमोल जावळे यांच्या निर्देशानुसार व मुख्याधिकारी निशीकांत गवई यांच्या आदेशावरून शहरात दाखल होणार्या सर्वच मार्गालगत असलेली अस्वच्छता दुर करीत या सर्व रस्त्यावर विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. नगरपरिषद कर्मचारी व जेसीबीच्या साह्याने स्वच्छता मोहिम राबवत शहरातील सभोेवतालच्या भागात परिपूर्णपणे स्वच्छता करण्यात आली. मुख्य मार्गाासह शहरात नगरपरिषदमार्फत विविध ठिकाणी व मेन रस्त्यावर साफसफाई करण्यात आली. मुख्य रस्त्यावरील बस स्टॅन्ड समोरील दुभाजक, चोपडा रोडवरील दुभाजक व सातोद-कोळवद रस्ता व भुसावळ रोड या ठिकाणावरील साफसफाई करून शहरातील आठवडे बाजार, स्मशानभूमी, श्रीराम नगर, सिनेमा रोड अशा विविध शहरातील विविध ठिकाणी कायम स्वच्छतेकरीता कर्मचार्यांकडे जवाबदारी सोपवण्यात आली. मुख्याधिकारी निशीकांत गवई, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अभियंता सत्यम पाटील, स्वच्छता निरीक्षक दिनेश अशोक घारु, मुकादम मोबीन शेख, महिला मुकादम कल्पना बबलू यांच्या देखरेखीत स्वच्छता अभियान राबवण्यात आले व कायम शहरात स्वच्छतेकरीता कर्मचार्यांवर जवाबदारी सोपवण्यात आली.

दुभाजक, रस्त्याच्या कडेवरील झाडे-झुडूपे छाटली
शहरातील प्रमुख रस्त्यावरील दुभाजकांवर वाढलेली झाडे-झुडपे तसेच शहरात दाखल होणार्या रस्त्याच्या कडेवरील वाढलेली झाडे-झुडूपे छाटण्यात आली आहे.
उघड्यावर काचरा टाकू नये
नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहेे. शहरात दैनदिन घंटागाडी, कचरा उचल करण्यास येत असल्याने उघड्यावर कचरा टाकू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. शहरातील आरोग्य विभागाविषयी तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक 9209240292 वर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




