जळगावात डॉक्टरांकडे पावणेतीन लाखांची धाडसी घरफोडी
A daring burglary of a doctor’s house worth Rs. 3.5 lakh in Jalgaon जळगाव (7 डिसेंबर 2024) : जळगाव शहरातील जिजाऊ नगरात एका डॉक्टरचे बंद घर फोडून घरातून दोन लाख 62 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लांबवण्यात आल्याने खळबळ उडाली. हा प्रकार शुक्रवार, 6 डिसेंबर रोजी पहाटे 3 वाजता समोर आला. याप्रकरणी सायंकाळी 7.30 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे घरफोडी प्रकरण
डॉ.दीप्तांशू भाऊसाहेब पाटील (25, रा.जिजाऊ नगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. वैद्यकीय सेवा करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार, 6 डिसेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घराचे कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून दोन लाख 62 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना पहाटे 3 वाजता समोर आला आहे. याप्रकरणी सायंकाळी 7.30 वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे करीत आहे.


