दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयात एकाने नशेत केली तोडफोड


यावल (9 डिसेंबर 2024) : यावल तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयात एका तरुणाने कारण नसताना जाऊन कार्यालयाची नासधूस केली व कर्मचार्‍यांना तसेच सरपंच उपसरपंच यांना शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारण नसताना शिविगाळ
दहिगाव येथील हर्षल उर्फ कालू विश्वास पाटील या तरुणाने गुरुवार, 5 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दहिगाव गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात कारण नसताना जाऊन तिथे असलेले ग्रामपंचायत कर्मचारी रवींद्र शिवाजी पाटील यांना खुर्चीवरून ताणून मारहाण करून सरपंच उपसरपंच कोठे गेले ? त्यांना व्यवस्थित काम करता येत नाही असे बोलून शिविगाळ करून मारहाण केली. ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील नऊ नंबर रजिस्टर आणि टेबल खुर्चीची मोडतोड केली व सरपंच उपसरपंच देविदास ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक राजाराम पाटील, पाणीपुरवठा कर्मचारी सुधाकर गोविंदा पाटील, विजय शालिग्राम पाटील, कर्मचारी रवींद्र पाटील अशांना अश्लील शिवीगाळ केली व मी तुम्हाला फसवून टाकील, अशी धमकी देत आत्महत्या करून तुमचे नावे टाकून तुम्हाला फसवेल, असा दम दिला. अशा आशयाची फिर्याद रवींद्र शिवाजी पाटील यांनी दिल्यावरून यावल पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !