आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात उद्या रक्तदान शिबिर
भुसावळ (10 डिसेंबर 2024) : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी व इनरव्हील क्लब ऑफ़ भुसावळ रेलसिटी यांच्या सयुंक्त विद्यमाने भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार, 11 रोजी सकाळी 10 ते 3 दरम्यान अष्टभुजा मंदिराजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी व अधिका-धिक प्रमाणात रक्तदान करावे, असे आवाहन प्रोजेक्ट चेअरमन नितीन धांडे, रोटरी रेलसिटी अध्यक्ष अॅड.विशाल शाह, इनरव्हील रेलसिटी अध्यक्षा मीनाक्षी धांडे, रोटरी रेलसिटी सचिव अनिल सहानी, इनरव्हील रेलसिटी सचिव किरण जावळे आदींनी केले आहे.





