भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धा
भुसावळ (14 डिसेंबर 2024) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकतीच फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली. सांस्कृतिक समिती आणि वनस्पती शास्त्र विभागातर्फे आयोजित या स्पर्धेत सिनियर आणि ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी सहभागी झाले.
प्रसंगी विद्यार्थ्यांनी बाजारात सहज उपलब्ध होणार्या आणि महाविद्यालय परिसरातील झाडांच्या पानांचा आणि फुलांचा वापर करून अत्यंत आकर्षक रचनांचे डेकोरेशन तयार केले. विद्यार्थ्यांनी साहित्य संकलन केल्यानंतर वनस्पती शास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी विद्यार्थ्यांना त्या पानांच्या आणि फुलांच्या वैद्यकीय तसेच सामाजिक उपयोगाची माहिती दिली. कोणतेही महाग साहित्य विकत न घेता, उपलब्ध पाने तसेच फुले अश्या साहित्याचा वापर करून अत्यंत उत्तम रचना तयार करण्यात येतात, असा संदेश ही या पुष्परचना स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आला.

परीक्षक म्हणून श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील प्रा.रागिणी सुभाष देशमुख, प्रा.वर्षा प्रमोद तायडे, कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील प्रा.शैलजा प्रकाश इंगळे यांनी काम पाहिले. स्पर्धा झाल्यावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी विद्यार्थ्यांच्या रचनांचे अवलोकन केले. आणि सुंदर डेकोरेशन तयार केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यानंतर परीक्षकांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. सिनियर कॉलेजच्या स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांकाचे फ्लॉवर डेकोरेशन रचनेचे प्रथम पारितोषिक जयश्री विजय केदारे, दुसर्या क्रमांकाचे पारितोषिक नयना गणेश जगताप, तिसर्या क्रमांकाचे पारितोषिक अजय व्यास आणि उत्तेजनार्थ पारितोषिक रेणुका शिवाजी पाटील तर कनिष्ठ महाविद्यालय गटातील प्रथम पारितोषिक आकांक्षा कानोजे व द्वितीय पारितोषिक जयश्री भोई या विद्यार्थ्याना जाहीर करण्यात आले.
ही पारितोषिके महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात वितरित करण्यात येतील. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक समिती चेअरमन प्रा.श्रेया चौधरी, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.जागृती सरोदे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.दयाघन राणे, प्रा.डॉ.संजय बाविस्कर, प्रा.वासकर यांनी सहकार्य केल्याचे प्रा.डॉ.संजय चौधरी कळवतात.

