नंदुरबार शहरात अल्पवयीनांसह युवकांचे शोषण : तक्रारदारांना पुढे येण्याचे शहर पोलिसांचे आवाहन


Nandurbar Minor Sexual Exploitation Case नंदुरबार (सोमवार, 10 ऑगस्ट 2026) : अल्पवयीन मुलांना पैसे आणि तत्सम अमिष दाखवून एकांतात नेत त्यांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचा प्रकार सतर्क नंदुरबार शहर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणातील आरोपी चेतन प्रकाश कोळी (22, रायसिंगपुरा, नंदुरबार) यास अटक करण्यात आली असून आरोपीच्या मोबाईलमध्ये शोषण केल्याचे अनेक व्हिडिओ पोलिसांना सापडले आहेत. या प्रकरणात तक्रारदारांनी पुढे यावे व त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, अशी माहिती तपासाधिकारी व निरीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे.

पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई
नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांना अल्पवयींना शोषण होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर 6 ऑगस्टच्या मध्यरात्री पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सापळा रचून संशयीताला रंगेहाथ अटक केली. आरोपी चेतन प्रकाश कोळी याला न्यायालयात हजर केल्यानंतर 12 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.





चार वर्षांपासून बालकांचे शोषण
प्राथमिक तपासात संशयित तरुण हा सन 2022 पासून अल्पवयीन बालके व समवयस्कर युवकांना लक्ष्य करून त्यांचे लैंगिक शोषण करीत असल्याचे निष्पत्र झाले आहे. असे असताना गेल्या चार वर्षात कोणत्याही पालकाने अथवा मुलांनी तक्रार का केली नाही? याबद्दल पोलिसांनाच प्रश्न पडला आहे. आरोपीच्या ताब्यातील मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह क्लीप्स आढळल्या असून पोलिसांकडून याबाबत व्हिडीओ व छायाचित्रांचा डिजिटल पुरावा फॉरेन्सिक पथकाने संपूर्ण वैज्ञानिक पध्दतीने जतन केला जात आहे.

पीडीत मुलांची ओळख पटवणे सुरू
या प्रकरणात पिडीतांची ओळख पटविण्याचे काम चालू असून अनेक क्लीप्स तपासण्यात आल्या असून हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे. आरोपीने गैर कृत्य करताना त्यांनी शहराबाहेरील काही मोकळ्या जागा आणि शेत शिवार यांचा वापर केल्याचे समोर आले आहे.

तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणार
आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून अनेक निष्पाप बालकांचे शोषण करण्यात आल्याने तक्रारदारांनी समोर येवून तक्रारी द्याव्यात, त्यांचे नाव पोलीस गुप्त ठेवतील, असे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. सामाजिक प्रतिष्ठेच्या कारणास्तव ज्या बालकांनी वा त्यांच्या पालकांनी ब्लॅकमेलिंग अथवा भीतीने हा प्रकार सांगितला नसल्यास कुठलीही भीती न बाळगता समोर यावे, असे आवाहनही शहर पोलिसांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !