उत्कृष्ट कामाने उंचावले पोलीस दलाचे नाव : भुसावळात पाच कर्मचार्यांचा गौरव
डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांची संकल्पना : कर्मचार्यांमध्ये वाढला कर्तव्याप्रती उत्साह
Excellent work elevates the name of the police force: Five employees honored in Bhusawal भुसावळ (24 डिसेंबर 2024) : पोलीस दलात काम करताना कर्तव्याप्रती सचोटी व प्रामाणिकपणा जोपासत पोलीस दलाचे नाव अधिकाधिक उंचावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार्या भुसावळ विभागातील पाच पोलीस कर्मचार्यांचा ‘एम्प्लॉई ऑफ द मंथ’पुरस्काराने भुसावळ विभागाचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी गौरविले. पोलीस प्रशासनातर्फे दर महिन्याला येथील बाजारपेठ पोलीस ठाणे, शहर पोलीस ठाणे, तालुका पोलीस ठाणे, शहर वाहतूक पोलीस ठाणे आणि नशिराबाद पोलीस ठाण्यातील प्रत्येक एका कर्मचार्यांना गौरविण्यात आले.
पुरस्काराने कर्मचार्यांमध्ये वाढले बळ
दर महिन्याला पोलीस कर्मचार्यांना क्राइम मिटींगमध्ये गौरवण्यात येते. भुसावळ डीवायएसपी कार्यालयातील मिटींग हॉलमध्ये आयोजित केलेल्या क्राइम मिटींगमध्ये कर्मचार्यांच्या कामाची माहिती अधिकारी व अन्य कर्मचार्यांना देण्यात येऊन डीवायएसपी इंगळे यांनी कर्मचार्यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सत्कार केला. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी फिरोज रज्जाक तडवी यांनी क्राईम अभिलेख चांगले अद्यावत करून प्रतिबंधक कारवाईकामी उल्लेखनीय कार्य केल्याने त्यांचा गौरव झाला. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी सीमा युवराज चौधरी यांनी बारनिशीचे काम उत्तम करून स्थानिक अर्ज निर्गती करण्यासाठी मदत केल्याने त्यांचा तसेच भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील सुभान तडवी यांनी गुन्हे निर्गतीकरण केल्याने त्यांचा गौरव करण्यात आला. नशिराबाद येथील गिरीष शिंदे व शहर वाहतूक शाखेतील स्मिता अहिरे यांनी लोक अदालतीमध्ये केसेस निर्गती करून उल्लेखनिय कामगिरी केल्याने त्यांचाही गौरव करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
यावेळी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ, शहरचे निरीक्षक उध्दव डमाळे, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश गायकवाड, वाहतूक शाखेचे सहा.निरीक्षक उमेश महाले, नशिराबादचे सहायक निरीक्षक आसाराम मनोरे, सहायक निरीक्षक नंदकिशोर काळे यांच्यासह 60 पोलीस अंमलदार यावेळी उपस्थित होते.









