भुसावळातील तेरापंथ युवक परिषदेतर्फे शिबिरात 81 दात्यांचे रक्तदान
भुसावळ (24 डिसेंबर 2024) : अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेतर्फे रविवार, 22 रोजी मातृभुमी चौकातील तेरापंथ भवनात रक्तदान शिबिर झाले. या शिबिरात 81 दात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन तेरापंथ खान्देश महासभेचे अध्यक्ष रवींद्र निमाणी, माजी नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी, महिला मंडळाच्या अध्यक्षा मंजू छाजेड यांच्याहस्ते करण्यात आले. सामाजिक जाणीव ठेवून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. गेल्या 12 वर्षांपासून रक्तदान शिबिर घेतले जाते. या शिबिराला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला.
81 दात्यांचे रक्तदान
शिबिरात सकाळी उद्घाटन झाल्यापासून रक्तदानासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सायंकाळी सात वाजेपर्यंत 81 दात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करुन आपण गरजूंचे प्राण वाचविण्यास सहकार्य करीत असल्याची भावना दात्यांनी व्यक्त केली. शिबिराच्या स्थळी आकर्षक सजावट करुन रक्तदान हा उपक्रम एक उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात आला. यासोबतच सेल्फी पॉइंट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले.

तेरापंथ युवक परिषदचे अध्यक्ष सोमेश सांखला, मंत्री अभय छाजेड, ब्लड डोनेशन कँम्पचे समन्वयक अमित निमाणी, अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषदेचे सदस्य देवेंद्र निमाणी, पंकज छाजेड आदींसह अर्लट ग्रुपच्या सर्व सदस्यांनी रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केले.









