भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयाच्या सुजल शुक्लाची विद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स संघात निवड


Sujal Shukla of De.N.Bhole College, Bhusawal, selected in the university athletics team भुसावळ (24 डिसेंबर 2024) : कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व जळगाव विभाग क्रीडा समिती अंतर्गत आंतर विभागीय मैदानी स्पर्धा एम.जे.कॉलेज, जळगाव येथे नुकत्याच झाल्या. त्यात दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील खेळाडू सुजल महेंद्र शुक्ला (एसवायबीसीए) हिने गोळा फेक, थाळी फेक प्रकारच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. भुवनेश्वर ओरिसा येथे होणार्‍या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी सुजलची निवड झाली आहे. ही स्पर्धा 26 ते 30 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे.

महाविद्यालय प्रशासनातर्फे सन्मान
खेळाडूने यश मिळवल्यानंतर महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी सत्कार केला. यावेळी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.डॉ.जयश्री सरोदे उपस्थित होते. विद्यापीठ क्रीडा संचालक प्रा.डॉ.दिनेश पाटील, निवड समिती सदस्य प्रा.डॉ.पी.आर.चौधरी, प्रा.डॉ.शैलेश पाटील, प्रा.विनीश चंद्रन, महाविद्यालयातील क्रीडा समिती सदस्य प्रा.डॉ.ए.आर.सावळे, प्रा.एस.डी.चौधरी, प्रकाश सावळे, सुनील ठोसर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !