भुसावळ विभागाचा कार्यक्षमता शिल्डने गौरव
डीआरएमसह अधिकार्यांचे स्वागत : विभागाला मिळाल्या सात शील्ड
भुसावळ (25 डिसेंबर 2024) : मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्रात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरम वीर मीना यांनी भुसावळ विभागाला संपूर्ण कार्यक्षमता शील्ड प्रदान केल्या. भुसावळ विभागाच्या रेल्वे व्यवस्थापक इती पांडे यांनी या शील्ड मंगळवारी स्वीकारल्यानंतर त्यांचे बुधवारी सकाळी भुसावळात आगमन होताच कर्मचार्यांनी जल्लोष करीत अधिकार्यांचे स्वागत केले.
रेल्वे कर्मचार्यांच्या उपस्थितीत प्रदर्शन
भुसावळ विभागाची टीम बुधवार, 25 रोजी ट्रेन क्रमांक 11057 दादर-अमृतसरने भुसावळात आल्यानंतर रेल्वे अधिकार्यांनी फुले व टाळ्यांच्या गजरात टीमचे स्वागत केले. शिल्डची झलक पाहण्यासाठी प्लॅटफॉर्म पूर्णपणे रेल्वे कर्मचारी आणि महिलांनी व्यापलेला होता. विभागीय कार्यालयात शाखा अधिकारी आणि रेल्वे कर्मचार्यांच्या उपस्थितीत शिल्ड्सचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

सात शील्ड जिंकल्या
भुसावळ विभागाने या वर्षी त्यांच्या गुणवत्तेसाठी महाव्यवस्थापकांची एकूण कार्यक्षमता याशिवाय संरक्षा, विद्युत, सिग्नल आणि टेलिकॉम, पर्सनल व सुरक्षा या विभागात पाच स्वतंत्र शील्ड तसेच पुणे आणि सोलापूर विभागांसोबत अनुक्रमे आणि स्टोअर्स शील्ड आणि पर्यावरण व आरोग्य शील्ड या दोन शील्ड जिंकल्या आहेत.
वैयक्तिक पुरस्काराचेही वितरण
मुंबईतील कार्यक्रमात विभागातील सर्व विभागांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल संपूर्ण कार्यक्षमता शील्ड प्राप्त झाल्या. महाव्यवस्थापक यांच्याहस्ते एकूण उत्तम कार्यक्षमतेसाठी प्रतिष्ठित असलेल्या सम्पूर्ण दक्षता शील्ड मिळाल्या तसेच उत्कृष्ट कामगिरीबद्दल भुसावळ विभागातील अधिकार्यांना व कर्मचार्यांना वैयक्तिक पुरस्कारही प्रदान करण्यात आले. विभागातील सर्व विभागांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल संपूर्ण कार्यक्षमता शील्ड प्राप्त झाल्या.
सात शील्ड प्राप्त : अधिकार्यांचाही गौरव
विभागीय रेल्वे व्यवस्थापक ईती पांडे यांनी संबंधित विभागाच्या शाखा अधिकार्यांसह संरक्षा शील्ड, विद्युत शील्ड, सिग्नल आणि टेलिकॉम शील्ड, कार्मिक शील्ड, सुरक्षा शील्ड, भांडार व्यवस्था शील्ड (भुसावळ आणि पुणे विभाग सह संयुक्तपणे), पर्यावरण आणि स्वच्छता शील्ड (सोलापूर आणि भुसावळ विभाग सह संयुक्तपणे). दरम्यान, भुसावळ विभागातील चार अधिकारी व 13 कर्मचार्यांना उत्कृष्ट सेवांकरीता सन्मानित करण्यात आले.









