भुसावळातील भोळे महाविद्यालयाच्या डिगंबर कोळीची विद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स पुरुष संघात निवड


भुसावळ (27 डिसेंबर 2024) : कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व जळगाव विभाग क्रीडा समिती अंतर्गत आंतर विभागीय मैदानी पुरुष स्पर्धा जळगावातील एम.जे.कॉलेजच्या मैदानावर नुकत्याच झाल्या. त्यात दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील खेळाडू डिगंबर कोळी (एस.वाय.बी. ए.) याने गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. या खेळाडूची भुवनेश्वर ओरिसा येथे होणार्‍या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड झाली. ही स्पर्धा 26 ते 30 डिसेंबरदरम्यान होत आहे.

विद्यालयात केला सत्कार
यशाबद्दल महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.राजू फालक यांनी सत्कार केला. यावेळी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.डॉ.जयश्री सरोदे आदींची उपस्थिती होती. विद्यापीठ क्रीडा संचालक प्रा.डॉ.दिनेश पाटील, निवड समिती सदस्य प्रा.डॉ.पी.आर.चौधरी, प्रा.डॉ.शैलेश पाटील, प्रा.विनिश चंद्रन, महाविद्यालयातील क्रीडा समिती सदस्य प्रा.डॉ.ए.आर.सावळेख प्रा.एस.डी.चौधरी, प्रकाश सावळे, सुनील ठोसर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !