भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात राष्ट्रीय वीर बाल दिवस उत्साहात
भुसावळ (28 डिसेंबर 2024) : भुसावळ शहरातील के.नारखेडे विद्यालयात राष्ट्रीय वीर बाल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या मनाचे संवर्धन करणे, त्यांचे मनोबल वाढवणे, त्यांची सर्जनशीलता वाढवणे आणि देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचे योगदान वाढवणे हा हेतू साध्य करण्यासाठी राष्ट्रीय वीर बाल दिवस साजरा केला जातो. या अनुषंगाने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रनिर्माणात मुलांची भूमिका आणि विकसित भारतासाठी माझा दृष्टिकोन या दोन विषयांवर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले. प्रसंगी विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षिका संगीता अडकमोल, बी.बी.जोगी, शैलेंद्र वासकर, माधव गरुडे, मिलिंद बोंडे उपस्थित होते. निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन एस.पी.महाजन व शिक्षक एस.पी.पाठक यांनी केले.










