बागेश्वरधाम झुरखेडा कथेसाठी यावल आगारातून बस व्यवस्था
यावल (28 डिसेंबर 2024) : धरणगाव तालुक्यातील झुरखेडा-निमखेडा शिवारात गुरूवार दि.26 डिसेंबर पासुन बागेश्वर धाम चे श्री धीरेंद्र शास्त्री यांच्या श्रीमुखातून हनुमान कथा होत आहे. या ठिकाणी 108 कुंडी होम हवन होत आहे. यासाठी यावल एसटी आगारातून यावल ते विदगाव कडून जळगाव व पाळधी पथराड मार्गे बागेश्वर धाम झुरखेडा येथे विशेष बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे.
प्रवाशांसाठी 105 रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे तर महिलांना 50 टक्के सवलत तर 75 वर्षे वयावरील प्रवाशांना एसटीतून मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली आहे.कथे स्थळी जाण्यासाठी प्रवाशांनी सुरक्षित प्रवास करण्यासाठी एसटीतूनच प्रवास करावा असे आवाहन यावल एसटी आगार प्रशासनातर्फे आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले आहे. तसेव भाविकांची गर्दी वाढल्यास एसटी बसेस वाढवण्यात येतील तरी भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.










