भुसावळात ‘उमंग’ वार्षिक स्नेहसंमेलन कलागुणांची उधळण


भुसावळ (28 डिसेंबर 2024) : श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळ संचलित श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘उमंग 2024-25’ मोठ्या उत्साहात झाले. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन पद्म आर्ट गॅलरी व विविध स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटक म्हणून नंदलाल मंडलेचा तर प्रमुख पाहुणे महेंद्र चोरडिया, शिरीष नाहाटा उपस्थित होते. दुपारी सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन ललिता चोरडिया यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सीए सीमा अग्रवाल उपस्थित होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून काजल अग्रवाल व प्रियंका चौधरी यांनी परीक्षणाचे कार्य केले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या नृत्य, गायन, नाटक, एकांकिका, मिमिक्री अशा विविध कला सादर करण्यात आल्या.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ.जान्हवी तळेगावकर, उपप्राचार्य डॉ.शरद अग्रवाल, पर्यवेक्षक प्रा.अर्चना झिंगरन, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.के.सी.सूर्यवंशी, प्रा.श्वेता नागला, स्नेहसंमेलन सचिव ज्योती प्रभाकर सावकारे, जास्मीन राजू तडवी, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !