वर्षाअखेरची गर्दी टाळण्यासाठी भुसावळसह 14 स्थानकांवर “या’ तारखेपर्यंत प्लॅटफार्म तिकीट विक्रीवर बंदी !


भुसावळ (29 डिसेंबर 2024) : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकांनी आतापासून नियोजन केले आहे तर अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे प्लॅनिंग केल्याने रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होत आहे. ही रेल्वे स्थानकावर होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या 14 मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री 29 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यत बंद करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेने निवडक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरते निर्बंध घातले आहे. प्लॅटफॉर्मवर होणार्‍या गर्दीचे व्यवस्थापन आणि स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी हे नियोजन केले आहे.

या स्थानकावर तिकीट विक्रीला बंदी
प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुर्गी आणि लातूर या स्थानकांचा समावेश आहे. वयोवृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही, अशांचा प्रवास सुलभ व्हावा या हेतूने हे नियोजन करण्यात आले आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !