चाळीसगावसह जळगावातून दोन लाखांचा गुटखा जप्त

चाळीसगाव शहर व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


जळगाव (शुक्रवार, 18 सप्टेंबर 2026) : चाळीसगाव शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने अवैध गुटखा तस्करीवर मोठी धडक कारवाई करीत दोन लाखांचा गुटखा जप्त केला तसेच 15 लाखांचे वाहनही जप्त केले. या प्रकरणी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या.

चाळीसगावात गुटखा जप्त
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अमितकुमार मनेळ यांना हिरापूर रोडवरील ठाकूरवाडी परिसरातील विनोद किराणा स्टोअर्समध्ये बंदी घातलेल्या गुटख्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. संशयीत नचिकेत सुनील येवले (हिरापूर रोड, चाळीसगाव) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून गुटखा जप्त करण्यात आला. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.




जळगावातही गुटख्यासह आयशर जप्त
दुसर्‍या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड यांच्या पथकाने जुने बी.जे.मार्केट, जळगाव येथे सापळा रचून 15 लाख रुपये किंमतीचे आयशर (एम.एच.48 ए.वाय.1848) जप्त करण्यात आले तसेच वाहनातील एक लाख 99 हजार 818 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !