फैजपूर भूमीचा ऐतिहासिक इतिहास जनमानसापर्यंत पोहोचला पाहिजे : प्रा.सुनील भिरूड
धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय परिषद
फैजपूर (30 डिसेंबर 2024) : फैजपूरच्या ऐतिहासीक भूमीचे बालपणापासूनच आकर्षण होते. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्या भूमीने देशाला नवविचारांची दिशा दिली. देशाचे स्वातंत्र्याचे विचार रुजविले, दलित, आदिवासी, व वंचितांना मुख्य प्रवाहात आणले. त्याच भूमीत मॉडर्न प्रोस्पेक्टिव्ह इन फिजिकल अॅण्ड केमिकल सायन्सेस या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून येणार्या काळात फिजिक्स आणि केमिस्ट्री विषयासाठी दिशादर्शक अश्या संशोधनावर उपयुक्त चर्चा होऊन समाज उभारणीसाठी भरीव कामगिरी होईल, असा आशावाद पुण्यातील सीओईपी टेक्नीकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुनील भिरुड यांनी येथे व्यक्त केला.

फैजपूरात एक दिवसीय परिषद
तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात आयोजित एकदिवसीय राष्ट्रीय परिषदेत उद्घाटक म्हणून डॉ.भिरूड बोलत होते. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम उषा) व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या सहकार्यातून एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी व आमदार शिरीष चौधरी हाते. चेअरमन लिलाधर विश्वनाथ चौधरी, सचिव मुरलीधर तोताराम फिरके, माजी प्राचार्य डॉ.जी.पी.पाटील, नियामक मंडळ सदस्य संजय काशीनाथ चौधरी, डॉ.आशुतोष बेडेकर (वडोदरा), डॉ.विपुल खेराज (सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुरत), प्रा.सचिन येवले (विभाग प्रमुख रसायनशास्त्र विभाग पु.ओ.नाहाटा महाविद्यालय, भुसावळ), कॉलेज ऑफ फार्मसी प्राचार्य डॉ.आर.एल.चौधरी, प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य डॉ.के.जी.कोल्हे यांच्यासहित देशभरातून आलेले प्राध्यापक, संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनसामाल्यांपर्यंत पोहोचावा इतिहास
कुलगुरू सुनील भिरूड यांनी फैजपूर या भूमीचा ऐतिहासिक वारसा अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगत आपण प्रत्येक शाळा महाविद्यालय व विविध आस्थापनांच्या माध्यमातून फैजपूर भूमीचा ऐतिहासिक इतिहास जनमानसापर्यंत पोहोचला पाहिजे व यातून नवभारताच्या निर्मितीसाठी विविध क्षेत्रातील कार्यशाळा, परिषदा व अधिवेशने यांचे आयोजने झाले पाहिजेत, असा आशावाद व्यक्त केला. फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयातील राष्ट्रीय परिषद येणार्या काळासाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. आमदार शिरीष चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र वाघुळदे यांनी केले.




