30 हजारांची लाच मागणी भोवली : नाशिक आयुक्त कार्यालयातील महसूल सहाय्यकाविरोधात गुन्हा
Bhowli demands bribe of Rs 30,000 : Case registered against revenue assistant in Nashik Commissioner’s office नाशिक (31 डिसेंबर 2024) : तक्रारदार यांच्या पक्षकारांच्या बाजूने निकाल लाऊन देण्याचे व नंतर लागलेला निकाल जाणीवपूर्वक विलंबाने अपलोड करून तो तक्रारदार यांच्या पक्षकाराच्या बाजूने लाऊन दिल्याचे मोबदल्यात 30 हजारांची लाच मागणी नाशिक विभागीय कार्यालयातील महसूल सहाय्यकाच्या अंगलट आली आहे. नाशिक एसीबीने आरोपी कैलास पाराजी वैरागे (51, रा. शिवदर्शन सोसायटी फ्लॅट नंबर 1, नाशिक रोड कोर्टाच्या मागे, नाशिक रोड, नाशिक) याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
59 वर्षीय तक्रारदार यांच्या पक्षकारांच्या बाजूने निकाल लाऊन देण्याचे व नंतर लागलेला निकाल जाणीवपूर्वक विलंबाने अपलोड करून तो तक्रारदार यांच्या पक्षकाराच्या बाजूने लाऊन दिल्याचे मोबदल्यात वेळोवेळी फोनवरून तक्रारदार यांच्याकडे 30 हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवण्यात आली. 29 ऑगस्ट, 31 ऑगस्ट व 6 सप्टेंबर रोजी लाच मागितल्याची पडताळणी करण्यात आली मात्र लाच स्वीकारण्यात न आल्याने रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला नोटीस बजावण्यात आली असून त्याच्याविरोधात नासिक रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
नाशिक एसीबी पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर, दीपक पवार, संदीप हांडगे, संजय ठाकरे, चालक विनोद पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.









