भुसावळातील झांबरे विद्यालयात आंतर वर्गीय क्रीडा स्पर्धा उत्साहात
दहावी अ संघ विजयी
अंतीम सामना 10 अ विरुद्ध 10 ब असा होवून बरोबरीत सुटला तर शेवटी पाच मिनिटांच्या चुरसीच्या लढाईत 10 वी अ चा संघ विजयी ठरला तर लहान गटात 7 वी विरुद्ध 6 वी यात झालेल्या अंतिम सामन्यात 6 वी च्या संघाने विजय संपादन केला. विजयी संघाना प्रदीप महाजन यांनी शाळेची दप्तरे तर उपविजयी संघास पॅड दिले. महाबली क्रीडा मंडळाचे सदस्य संजय पाटील, आजी-माजी खेळाडू गणेश लोहार, चेतन लोहार, विक्की खंडारे, संकेत माने, मनीष अहिरे, देवांग पाटील, समर तायडे, टीकाराम पाटील, कुणाल माळी, विलास कोळी, शुभम कोळी, विशाल कोळी, संतोष पवार, वेदांत ठोसर, भूषण गवळे, देवा भोई, रितेश भोई यांनी पंच म्हणून काम पाहिले.