धनाजी नाना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उधळले कलागुणांचे रंग

शालेय नृत्य स्पर्धा उत्साहात : शिरीष चौधरी यांनी केला कौतुकाचा वर्षाव


सावदा (4 जानेवारी 2025) : खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शालेय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कुटुंबप्रमुख व माजी आमदार शिरीष चौधरी, संस्थाध्यक्ष कुमार चौधरी, संस्थेचे सचिव प्रभात चौधरी, रोहिणी चौधरी, संचालक अशोक कोलते, प्राचार्या लता मोरे, मुख्याध्यापिका हर्षा नेमाडे, मुख्याध्यापिका मनिषा महाजन, नेहा कात्रे, परिसरातील पालक आदींची उपस्थिती होती.

सरत नृत्यांना मिळाला दाद
उद्घाटन कुमार चौधरी यांनी केले. प्रमुख अतिथी प्रभात चौधरी व उपस्थित मान्यवरांच्यनी स्व.मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन केले. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका मनिषा महाजन यांनी केले.


पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांचा सहभाग
यावेळी विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस नृत्यानी उपस्थितांना खिळवून ठेवले. यात मेरा वाला डान्स, सामी सामी गाणे मिक्स गाणे, शिवबा आमचा म्हलारी, जलवा जलवा, गुजराती गीत हालो हालो माणो तेतूडो, रणछोड रंगीला, कान्हा सो जा जरा, रिमिक्स गाणे, गवळण राधे तू हळू हळू चाल, फिरी फिरी चाल, आसामी साँग, कोळी,अहिराणी ,देशभक्ती ,गोंधळ राजस्थानी, आसामी, गुजराती गीतांवर प्रेक्षकांना ठेका धरायला भाग पाडले. 39 नृत्य चार गटातील पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांनी सादर केले. महाभारत, सावित्रीबाई थीमवर आधारित सादर केलेल्या नृत्याने सर्वांनाच भावनिक केले. नटरंग या लावणी नृत्याने प्रेक्षकांना ठेका धरायला लावला. आय.बी.बडगे व एन.डी.काळुसे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कुटुंबप्रमुख शिरीष चौधरी यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धक विद्यार्थ्यांचे कौतूक केले व विद्यार्थ्यांनी कला जोपासना केली पाहिजे यामुळेजीजवन आनंददायी होण्यास मदत होते, असे सांगत सावित्रीबाई फुले थीम नृत्याचे विशेष कौतुक केले.

असा आहे स्पर्धेचा निकाल- प्रथम गट (पाचवी-सहावी)- प्रथम- इब्राहिम तडवी (पाचवी अ गु्रप), द्वितीय-श्रावणी होले (पाचवी ब गु्रप), तृतीय गीत वायकोळे (सहावी क गु्रप)

दुसरा गट (सातवी-आठवी)- प्रथम- तिक्षा महाजन (सातवी ब गु्रप), द्वितीय- प्राची नहाले (आठवी ड), तृतीय- दामिनी कुंड (आठवी क गु्रप)

तृतीय गट (नववी-दहावी)- प्रथम- सुचिता चौधरी (दहावी ब गु्रप), द्वितीय- ममता पाटील (दहावी ड गु्रप), तृतीय- उपासना पाटील (नववी ब गु्रप)

चतुर्थ गट (अकरावी-बारावी) प्रथम- अंकिता पवार (बारावी विज्ञान ग्रुप), द्वितीय- समीक्षा इंगळे (अकरावी विज्ञान गु्रप, तृतीय- वैष्णवी वाघुळदे (बारावी विज्ञान). कार्यक्रमासाठी पालक बहुसंख्येने उपस्थित होते. पर्यवेक्षक एस.पी.चौधरी, संगीत शिक्षिका कल्पना गावंडे, पंकज वानखेडे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मनिषा पाटील व जगदीश ढोले यांनी तर आभार बी.आर.डोळे यांनी मानले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !