विवाहितेच्या प्रेमसंबंधात पनवेलमधील पोलीस पतीचा अडथळा : भावाची मदत घेत केली हत्या

24 रुपयांच्या पेमेंटमुळे गुन्ह्याची उकल : प्रियकर, विवाहित प्रेयसीसह तिघांना बेड्या


जळगाव (8 जानेवारी 2025) : लग्नानंतर विवाहितेने प्रेमसंबंध कायम ठेवले मात्र त्यात पतीच अडसर ठरू पाहत असल्याने प्रियकर व भावाची मदत घेत विवाहितेने पोलीस दलातील पतीची हत्या करीत मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकला मात्र सतर्क लोकलच्या मोटरमनने वेळीच गाडी थांबवत पोलीस बोलावले. तपासाच्या धागेदोर्‍यात मयत विजय चव्हाण याने अंडाभूर्जी खाल्याने त्याचे पैसे ऑनलाईन पेड केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवल्यानंतर खूनापूर्वीच्या स्टोरीचा उलगडा होवून तिघा आरोपींना बेड्या पडल्या.

असे आहे खून प्रकरण
अमळनेर येथील रहिवासी आणि पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनवर कार्यरत पोलीस हवालदार विजय चव्हाण हे घनसोली येथे राहत होते. विजय चव्हाण यांची पत्नी पूजा हिचे भूषण ब्राम्हणे याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. या प्रेमसंबंधात विजय अडथळा ठरत असल्याने तिने पतीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. प्रियकर भूषण आणि मामेभाऊ प्रकाशच्या मदतीने हत्येचा प्लॅन केला. प्रकाशने विजय यांच्या सोबत ‘थर्टीफर्स्ट’च्या पार्टीचे नियोजन केले. सायंकाळी विजय आणि प्रकाश यांनी पार्टी केली. नंतर बाजूलाच हातगाडीवर भुर्जी घेऊन ते गाडीत बसले. यानंतर ठरल्याप्रमाणे गाडीमध्ये आधीपासून हजर असलेल्या प्रियकर भूषण आणि प्रवहण याने गळा आवळून त्यांची हत्या केली.


हत्येनंतर, आरोपींनी अपघाताचा बनाव करण्यासाठी 1 जानेवारी रोजी पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह रबाळा ते घणसोली रेल्वे मार्गावर ठाण्यावरून वाशीच्या दिशेने जाणार्‍या पहिल्या लोकल रेल्वे समोर फेकला होता. मोटरमनच्या लक्षात आल्याने त्यांनी गाडी थांबवत रेल्वे व वाशी पोलिसांना माहिती दिली, मारेकर्‍यांचा तपास सुरू झाला.

विजय चव्हाण यांच्या ‘गुगल पे’ वरून अंडाभुर्जी हातगाडीवर 24 रुपयांचे ऑनलाईन पेमेंट केले असल्याचे पोलिसांचे लक्षात आले. हातगाडीवर सीसीटीव्हीचा तपास केला असता मयत विजय चव्हाण सोबत त्याचा मेव्हणा असल्याचे दिसून आले होते. त्याचा मेव्हणा व पत्नीचा मामेभाऊ याने दारू पाजली. पिल्यानंतर अंडा भुर्जी खाण्यासाठी गेले होते. त्यावरून मेव्हण्याला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने घटनेचा उलगडा पोलिसांना केला.

विजय चव्हाण यांच्या पत्नी पूजा चव्हाण आणि तिचा प्रियकर भूषण ब्राह्मणे यांनी त्यांच्या भावांसोबत मिळून हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. आरोपींमध्ये पूजा चव्हाण, भूषण ब्रह्मणे (29), प्रकाश चव्हाण (23) आणि प्रवीण पनपाटील (21) यांचा समावेश आहे.या सर्व आरोपींना अटक केली आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !