नवीन नियमांचा लाडक्या बहिणींना फटका : अडीच लाखांपेक्षा कमी उत्त्पन्न असलेल्या महिलांनाच मिळणार लाभ
मुंबई (11 जानेवारी 2025) : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्यात सक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेत दर महिन्याला महिलांना 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत जुलै ते डिसेंबरपर्यंतचे 9000 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाल्यानंतर आता लाडक्या बहिणींचे लक्ष जानेवारी महिन्याच्या पैशांकडे आहे. मात्र, अशातच लाडकी बहीण योजनाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेत काही महिलांना नवीन निमयानुसार जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही.यामुळे काही महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अटी आणि शर्ती
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निश्चित अटी तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांनाच लाभ मिळणार आहे. महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे आणि त्या महाराष्ट्राच्या रहिवासी असणे आवश्यक आहे. सरकारी कर्मचारी असलेल्या कुटुंबातील महिला आणि पेन्शनधारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 21 ते 65 वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल.

इतर योजनांचा लाभ आणि वाहन मालकी
ज्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. पीएम किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना ही योजना मिळणार नाही. त्याचसोबत, ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन आहे, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
डिसेंबरचा हप्ता आणि नव्या लाभार्थींचा समावेश
डिसेंबर महिन्याचा हप्ता येत्या आठवडाभरात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात सांगितले होते की, डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणेच जमा होणार आहे. या योजनेत आता जवळपास 12 लाख नव्या महिलांचा समावेश होणार आहे.
