जळगाव जिल्ह्यात ऑपरेशन मुस्कान : हरविलेल्या 19 मुलींसह 51 बालके स्वगृही परतली


जळगाव (11 जानेवारी 2025) : गेल्या महिन्यात डिसेंबर 2024 मध्ये ऑपरेशन मुस्कान 13 ही शोध मोहिम जिल्ह्यात पोलीस दलाने राबविली. या अंतर्गत हरविलेल्या सुमारे 32 मुले व 19 मुली असे 51 बालकांचा शोध लावला. यासर्व मुलांना त्यांच्या त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

या मोहिमे दरम्यान मुलांचे आश्रयगृह, अशासकीय संस्था, रेल्वेस्थानक, बसस्थानक, रस्त्यावर भीक मागणारी अथवा वस्तु विकणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मीकस्थळे, रुग्णालय, हॉटेल, दुकाने, सिग्नल, मार्केट आदी ठिकाणी काम करणारी व भीक मागणारी लहान मुले यांना हरविलेले मुलामुलींना त्यांच्या घरी नेवुन त्यांचे आई-वडील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.


अशी राबविली मोहिम
शोध लागलेल्या मुलामुलींना बाल कल्याण समिती जळगाव यांच्याकडे सुपुर्द केले. त्यांचे फोटो घेवुन त्यांची माहिती अद्ययावत केली. त्यानंतर त्यांच्या कायदेशीर पालकांचा शोध पथकाने लावला.

यांचे होते आदेश
या मुलांचे आई, वडील किंवा कायदेशीर पालक तसेच अनाथ ज्या मुला मुलींना कोणीही नातेवाईक नाही अशा मुला मुलींना बाल कल्याण समिती जळगाव यांच्याकडे सुपुर्द करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालय व केंद्रीय गृह मंत्रालय नवीदिल्ली, विपोमनि, महिला बाल अत्याचार प्रतिबंध विभाग मुंबई यांनी दिले होते. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष जळगाव यांचे मार्फत नियुक्त स्वतंत्र पथकाव्दारे ही मोहिम राबविण्यात आली.

यांनी राबविले मुस्कान ऑपरेशन
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, प्रभारी पोलीस उप अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक कक्षातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दीपाली पाटील, अंमलदार एएसआय विठ्ठल फुसे, महिला सहायक फौजदार निलीमा हिवराळे, सफौ रवींद्र गायकवाड, पोहेकॉ अनिल पाटील, पोहेकॉ दीपक पाटील, मपोहेकॉ मनिषा पाटील, मपोना वहीदा तडवी तसेच जिल्ह्यातील केशवस्मृती प्रतिष्ठान अंतर्गत समतोल प्रकल्प, आदर्श बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या मार्फत हे मुस्कान ऑपरेशन राबविण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !