भुसावळातील तेहरीन खून प्रकरणात एका आरोपीला बल्लारशातून अटक

जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी : पाच संशयीत मात्र अद्यापही पसारच


One accused in Teheran murder case in Bhusawal arrested from Ballarsha भुसावळ (12 जानेवारी 2025) : शहरातील शरीरसौष्ठवपटू अफाक पटेलच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शहरातील तेहरीन नासीर शेख (27) याची शुक्रवार, 10 जानेवारी रोजी सकाळी 7.20 वाजता गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या खुनातील एका संशयीताला जळगाव गुन्हे शाखेने बल्लारशा येथून अटक केली आहे. शनिवारी पहाटे ही कारवाई करण्यात आल्यानंतर सायंकाळी आरोपीला बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रमीज पटेल (भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

काय घडले नेमके ?
शहरातील जाम मोहल्ला चौकातील चहाच्या दुकानात शुक्रवार, 10 जानेवारी रोजी सकाळी 7.20 वाजता झालेल्या गोळीबारात तेहरीन शेख यांचा मृत्यू झाला. यामुळे त्या भागात एकच खळबळ उडाली. दरम्यान विना क्रमांकाच्या मोटारसायकलने आलेले चारही हल्लेखोर घटनेनंतर पसार झाले. या घटनेत सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल आहे. संशयीत खुनानंतर पसार झाल्यानंतर गुन्हे शाखेने बल्लारशहा येथे नातेवाईकांकडे लपून असलेल्या रमीज पटेल या संशयीताला अटक कली. अन्य संशयीतांच्या मागावर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील पोलीस आहेत.


खडकारोड, जाम मोहल्ला चौकात गस्त
जाम मोहल्ला चौकात झालेल्या खूनानंतर पोलिसांचा या भागात बंदोबस्त लावत गस्त वाढवली आहे. शुक्रवारी घडलेल्या खूनाच्या घटनेचा गोळीबाराच्या वेळेचे सीसीटिव्ही फुटेज शहरात अनेकांच्या मोबाईलवर व्हायरल झाले आहे.

या संशयीताविरोधात गुन्हा दाखल
शुक्रवारी रात्री उशिरा तेहरीन नासीर शेख याच्या खून प्रकरणी जाकीर मेहबूब खान (43, रा.जाम मोहल्ला, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरुन संशयीत तनवीर पटेल, अन्वर पटेल, रमीज पटेल, साईल शेख, मजीद पटेल, अदनान उर्फ युनूस यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !