बंदीनंतरही नॉयलॉन मांजा सुसाट : फौजदाराचाच चिरला गळा


Nylon rope is still effective even after the ban : The throat of the soldier was slit छत्रपती संभाजीनगर (14 जानेवारी 2025) : नायलॉन मांजावर बंदी आणूनही मांजा विक्री कायम आहे. त्यातच छत्रपती संभाजीनगरातील स्थानिक गुन्हे शाखेत फौजदार असलेल्या सचिन पारधे यांचा नायलॉन मांजाने गळा चिरल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता बीड बायपास परिसरातील सुधाकरनगरात घडली. या घटनेत पारधे गंभीर जखमी झाले.

काय घडले नेमके ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेत अधिकारी असलेले पारधे हे मंगळवारी सकाळी दहा वाजता कर्तव्यावर दुचाकीने निघाल्यानंतर अचानक मांजाने त्यांचा गळा कापला गेला. स्थानिकांनी धाव घेत त्यांना तत्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.


प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ही घटना इतकी गंभीर होती की पारधे यांच्या गळ्याला मांजा लागताच रक्ताच्या धारा निघाल्या. दुचाकीवरून तोल जाऊन ते खाली कोसळले. मांजा त्यांच्या गळ्यामध्ये अक्षरशः रुतला होता.

तातडीने शस्त्रक्रिया
शहानुरमिया दर्गा परिसरातील एका खाजगी रुग्णालयात पारधे यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. घटनेची माहिती कळताच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक सुनील लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांनी रुग्णालयात धाव घेतली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !