भुसावळात जय संताजी महिला मंडळाची स्थापना
अध्यक्षपदी कविता चौधरी तर सचिवपदी उज्वला बागुल
भुसावळ (14 जानेवारी 2025) : महिलांचे आर्थिकदृष्टया सबलीकरण व्हावे याउदात्त हेतूने शुक्रवार, 10 जानेवारी रोजी समाजातील महिलांनी एकत्र येऊन स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी भुसावळ जय संताजी तेली समाज महिला मंडळा साठी सर्वानुमते कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शहरातील खडका रोड पाटील मळा भागातील तेली भवनात स्नेहमिलन कार्यक्रम झाला. महिला अध्यक्षपदी माजी नगरसेविका कविता अशोक चौधरी व सचिवपदी पत्रकार उज्वला बागुल यांची निवड करण्यात आली.
अशी आहे कार्यकारिणी
उपाध्यक्ष रेखा धुपे, सहसचिव प्रतिभा चौधरी, कोषाध्यक्ष भारती चौधरी, सल्लागार डॉ.वृषाली चौधरी, कार्यकारिणी सदस्या प्रियंका किरण चौधरी, सुरेखा संजय चौधरी, सविता गणेश सोनवणे, वैशाली सुनील चौधरी, गायत्री विजय चौधरी, उज्वला गोपाळ चौधरी, दीपाली चौधरी, पुष्पा चौधरी, सुनीता पाटील, ज्योती चौधरी, रंजना चौधरी यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमात मकर संक्रांतीनिमित्त महिलांचे हळदीकुंकू व विविध कार्यक्रमांबाबत चर्चा करण्यात आली .

यांची होती उपस्थिती
यावेळी वर्षा चौधरी, सुजाता अनिल चौधरी, रंजना चौधरी, शीतल गणेश चौधरी, भारती चौधरी, मनुश्री राहुल पाटील, मंदाबाई देवरे, मनीषा सोनवणे, उज्वला सोनवणे, यशोदा चौधरी, मंगला चौधरी, शोभा चौधरी, सुनंदा प्रकाश पाटील, रेखा चौधरी, मनीषा चौधरी, आशा चौधरी, सोनाली पाटील यांच्यासह समाजातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
