सुरत स्थानकाचा पुर्नविकास : या रेल्वे गाड्या आता सुरतऐवजी उधन्यावरून सुटणार !
मार्च महिन्यापर्यंत रेल्वे प्रवाशांची होणार गैरसोय
भुसावळ (15 जानेवारी 2025) : सुरत रेल्वे स्थानकावर पुनर्विकास कामामुळे सुरत रेल्वे स्थानकावरून सुटणार्या अप-डाऊन मार्गावरील सहा रेल्वे गाड्या उधना स्थानकावर सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे खान्देशातील रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. उधना स्थानकावरून सुटणार्या गाड्यांमध्ये सुरत-पुरी, सुरत-मालदा टाउन आणि सुरत-भागलपूर एक्सप्रेसचा समावेश आहे.
सुरत स्थानकाचा पुर्नविकास
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, सुरत रेल्वे स्थानकावर टप्पा दोन अंतर्गत पुनर्विकासाचे काम सुरू आहे. सुरत येथून चालवल्या जाणार्या काही गाड्या आता सुरत स्थानकाऐवजी उधना स्थानकावरून चालवल्या जाणार असल्याने खान्देशातील प्रवाशांची काहीशी गैरसोय होणार आहे.
या गाड्या आता उधन्याहून सुटणार
गााडी क्रमांक 22828 सुरत-पुरी साप्ताहिक एक्सप्रेस 14 जानेवारी ते 4 मार्चदरम्यान उधना स्थानकावरून 08.20 वाजता सुटेल तर गााडी क्रमांक 22827 पुरी-सुरत साप्ताहिक एक्सप्रेस 12 जानेवारी ते 2 मार्चदरम्यान उधना स्थानकापर्यंत धावणार आहे. गााडी क्रमांक 13426 सुरत-मालदा टाउन साप्ताहिक एक्सप्रेस 13 जानेवारी ते 3 मार्चदरम्यान उधना स्थानकावरून 2.30 वाजता सुटेल तर गाडी क्रमांक 13425 मालदा टाउन-सुरत साप्ताहिक एक्सप्रेस 11 जानेवारी ते 1 मार्चदरम्यान उधना स्थानकापर्यंत धावणार आहे. गााडी क्रमांक 22947 सुरत-भागलपूर साप्ताहिक एक्सप्रेस 29 मार्चपर्यंत उधना स्थानकावरून 10.20 वाजता सुटेल तर गाडी क्रमांक 22948 भागलपूर-सुरत साप्ताहिक एक्सप्रेस 31 मार्चपर्यंत उधना स्थानकापर्यंत धावणार आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.






