भूगोल हा मानवाच्या प्रत्येक घटकावर प्रभाव टाकणारा घटक : प्रा.अनिल हिवाळे


भुसावळ (16 जानेवारी 2025) :  प्रत्येक देशामध्ये भौगोलिक माणसांचे अन्न, वस्त्र, निवारा हे सर्व तेथील भौगोलिक परिस्थितीवरून ठरते. धर्मांचाही विचार केला तर प्रत्येक धर्माच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपले आचार-विचार, खान-पान, राहणीमान यांच्याशी अध्यात्मिक धर्म आपली जडण-घडण घडवीत असतात त्यामुळे भूगोल हा मानवाच्या प्रत्येक घटकावर प्रभाव टाकत असतो, असे मत भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयातील भूगोल विभाग प्रमुख प्रा.डॉ.अनिल हिवाळे यांनी व्यक्त केले.

श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात भूगोल विभाग आणि विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, 14 जानेवारी रोजी ‘भूगोल दिन’ उत्साहात साजरा झाला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.शरद अग्रवाल होते. आधुनिक जीवन शैलीसोबत आपण संस्कारे व परंपरांचे जतन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.


प्रास्ताविक प्रा.गिरीश सरोदे यांनी केले. महाविद्यालयांमध्ये पोस्टर स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. पोस्टर स्पर्धेत प्रथम बिपाशा कनोजिया, द्वितीय धनश्री भालेराव तर रांगोळीत प्रथम पूनम विजय लोखंडे व द्वितीय बिपाशा कनोजिया आली. सर्व सहभागी विद्यार्थिनींनाही सहभाग म्हणून भूगोल विभाग समन्वयक प्रा.गिरीश सरोदे आणि आकांक्षा धांडे संचालिका, सनराईज किड्स झोन यांच्यातर्फे पारितोषिक देण्यात आले. सूत्रसंचालन धनश्री कोळी तर कार्यक्रमाचे आभार वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.जीवन धांडे यांनी मानले. परीक्षक म्हणून प्रा.निलेश गुरूचल, प्रा.संदीप नेतन राव, प्रा.दीपाली पाटील आणि काजल ठाकूर होत्या. प्रा.दीपाली पाटील, प्रा.निलेश गुरूचल, प्रा.डॉ.गिरीश कोळी, प्रा.विनोद भालेराव, प्रा.संदीप नेतनराव, प्रा.पंकज फालक, प्रा.रवीकांत वासनिक, प्रा.करण भालेराव यांचे सहकार्य लाभले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !