साकेगावात 25 वर्षांच्या आठवणींना उजाळा

माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा


Relive 25 years of memories in Sakegaon भुसावळ (16 जानेवारी 2025) : इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयातील 1998-99 सालच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थीनींचा स्नेहमेळावा बुधवार, 15 रोजी मंगलमूर्ती लॉन्समध्ये झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका कोल्हे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक नामदेव सावळे, शिक्षक नेमाडे, दिलीप मराठे, भारुडे, संध्या चौधरी, नेमाडे, राजू पाटील, दिगंबर सपकाळे, परेश सपकाळे यांच्यासह शाळेचे शिपाई सुनील पाटील, रमेश सोनवणे उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी विद्यार्थी जयेश राणे, डॉ.कैलास ठाकरे, नारायण कोळी यांनी केले.

यांची होती उपस्थिती
दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना आदरांजली वाहण्यात आली. उपस्थित शिक्षकांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रथम माजी विद्यार्थी यांनी आपापला परिचय करून देत शाळा व शिक्षकांविषयी आदर व्यक्त केला. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. 25 वर्षानंतर भेटलेल्या माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या मनसोक्त गप्पा झाल्या. सर्व विद्यार्थी एकत्र आल्याने जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.


विद्यालयाचे चेअरमन दिलीपसिंग पाटील यांनीही उपस्थिती दिली. माजी विद्यार्थी नरेंद्र फालक, नारायण कोळी, जयेश राणे, एजाज पटेल, विकास पाटील, दीपक पाटील, सुनीता भागवत, देवेंद्र पाटील, किरण जावळे, हर्षल पाटील, योगेश भोई, पंकज पाटील, किशोर पाटील, विजय खंबायत, प्राजक्ता नेहेते, ललित कोल्हे, चंदू उपासे, इम्रान खान, गोविंदा कचरे, वैशाली लोणे, जाकिर शेख, हमीद पटेल, सोनाली वाघोदे, भारती भारुडे, कैलास ठाकरे, प्रमोद सोनवणे, गणेश पाटील, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !