सहकारी संस्था मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील : क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
फैजपूर शहरात सहकार मेळावा उत्साहात
फैजपूर (23 जानेवारी 2025) : देशातील सहकारी संस्था मजबूत करून त्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकार सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून मोठे प्रयत्न करत आहे. संस्था कार्यकर्त्यांनी पुढे येऊन संस्थांच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत रहावे, असे आवाहन क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी येथे केले.
फैजपूर येथे राष्ट्रीय सहकार भारती स्थापना दिन सप्ताह व सहकार महर्षी जे.टी.महाजन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने सहकारी संस्था कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

यांची होती उपस्थिती
सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगाडे यांनी सहकार भारतीची स्थापना व उद्देश यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी केले. देश विकसीत करण्यासाठी सहकारी संस्थांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मंत्री दिलीप रामू पाटील होते. राष्ट्रीय महिला प्रमुख रेवती शेंदुर्णीकर, आमदार अमोल जावळे, शरद महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर भागवत पाटील, चंद्रहास गुजराथी, सुरेश धनके, हिरालाल चौधरी, नारायण चौधरी, नितीन चौधरी, राकेश फेंगडे, मनोजकुमार पाटील, चंद्रशेखर चौधरी, शशिकांत बेहडे, धनराज फिरके, प्रवीण कुडे उपस्थित होते. काशिनाथ वारके, भूषण नारखेडे, शेखर चौधरी, राजेंद्र माणेकर, राजू मिस्त्री, किशोर नेहते, अनिल नारखेडे यांनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन ए.एस.बडगुजर व किरण चौधरी यांनी केले.
