सकारात्मक विचार व कृतीतून जग जिंकता येते : तहसीलदार निता लबडे


भुसावळ (29 जानेवारी 2025) :  सकारात्मक विचार व कृतीतून जग जिंकता येते. यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो, यश मिळवण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवून ध्येय निश्चिती केल्यास यश हमखास मिळेल, असा आशावाद भुसावळच्या तहसीलदार निता लबडे यांनी येथे व्यक्त केला. सातपुडा शिक्षण संस्था भुसावळ संचलित दादासाहेब आर.जी.झांबरे माध्यमिक विद्यालयात चैतन्य चिरंतन बक्षीस व शालेय पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. स्व.डॉ.यशोदा लक्ष्मण चौधरी यांच्या दान ठेवींवरील व्याजातून लाभार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यावेळी करण्यात आले. शाळेचे चेअरमन व्ही.एम.महाजन यांनी निता लबडे यांचे स्वागत केले. नायब तहसीलदार शोभा घुले यांचाही सत्कार करण्यात आला. प्राास्तविक एस. डी.बावस्कर व ए.एन.शुक्ल यांनी केले.

यांची विचार मंचावर उपस्थिती
मंचावर संस्थेचे संचालक मंडळाचे पदाधिकारी जे.एच.चौधरी, ए.एन.शुक्ल, उपाध्यक्ष एच.जे.चौधरी, सागर एच.चौधरी, बी.डी.पाटील, प्राथमिक विद्यामंदिराचे चेअरमन एस.बी.पाटील, शालेय समितीचे सदस्य एस.आर.झांबरे, पी.ए.शुक्ला, पी.एस.झांबरे, दीपक जे.चौधरी, रमेश सुकदेव भोई, पर्यवेक्षक एस.डी.बावस्कर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री भारंबे उपस्थित होत्या. सूत्रसंचालन के.एम. पाटील, एम.एन.गुरचळ तर आभार वाय.एन.चौधरी यांनी मानले. पर्यवेक्षक एस.डी.बावस्कर यांच्या नेतृत्वात सांस्कृतिक विभागाने सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !