प्रत्येक नवमतदारांनी नाव नोंदणी करावी : प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने


रावेर (31 जानेवारी 2025) : लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व नवमतदारांनी आपल्या नावाची नोंदणी करायला हवी, असे आवाहन प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांनी केले.

यांची होती उपस्थिती
रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. अतिथी म्हणून निंभोरा पोलीस स्टेशनचे सहा.निरीक्षक हरिदास बोचरे, सहाय्यक सरकारी वकील विक्रम शेळके, सरपंच अमोल महाजन, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष काशीनाथ पाटील उपस्थित होते.




या कार्यक्रमात डॉ.जे.पी.नेहेते यांनी शपथ दिली. नवीन मतदार नोदणी फॉर्म वाटप करण्यात आले. देशातील मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे त्यासाठी महाविद्यालयीन तरुणांनी समाज प्रबोधन करणे आवश्यक आहे, असे मत अ‍ॅड.विक्रांत शेळके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.एस.पी.उमारीवड यांनी तर प्रास्ताविक प्रा.हेमंत बाविस्कर यांनी केले. आभार प्रा.हेमंत बाविस्कर यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.एस.एन.वैष्णव, डॉ.जे.पी.नेहेते, डॉ.व्ही.एन.रामटेके, प्रा.अक्षय महाजन, डॉ.एस.ए.पाटील, प्रा.प्रदीप तायडे, प्रा.केतन बारी, डॉ.पी.आर.गवळी, श्रेयस महाजन यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !