गरीब व कष्टकर्‍यांना वरणगावात उबदार ब्लँकेटचे वाटप

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम


वरणगाव (10 फेब्रुवारी 2025) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते कॉमन मॅन एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी सकाळी वरणगाव येथील गरीब व कष्टकरी गरजू कामगारांना थंडीपासून संरक्षण व्हावे या दृष्टीने शिवसेना (शिंदे गट) पक्ष कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ब्लँकेट वाटप करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी शिवसेनेचे भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी (आपला माणूस), सय्यद जाफरअली हिप्पी सेठ, शहर संघटक दुर्गेश बेदरकर, तालुका समन्वयक सुरेश चौधरी, महिला तालुका संघटका मनीषा पाटील, तालुका संघटक प्रशांत पाटील, कमलेश येवले, फिरोज खातिक, युवा सेना तालुका प्रमुख राहुल बावणे, मनोज सावळे, ताज शहा, पंकज पाटील, नाना माळीसह पदाधिकारी व कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील प्रतिभा नगरातील गंगाराम कॉलनीतील शहा बिरादरीचे कष्टकरी कवाडे नगरातील कामगार व छोट्या मुलांचे थंडीपासून संरक्षण व्हावे या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !