भुसावळात रोटरी रेलसिटी सायक्लोथॉनमध्ये 650 सायकलपटूंचा सहभाग


भुसावळ (17 फेब्रुवारी 2025) : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सायक्लोथॉन’ स्पर्धेचे रविवार, 16 रोजी आयोजन करण्यात आले. 659 स्पर्धकांनी 20 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि पाच किलोमीटरच्या सायकल फेरीमध्ये भाग घेतला.

वयोवृद्ध नागरिकांचाही सहभाग
स्पर्धेत 69 वर्षीय हिरालाल पाटणकर, 65 वर्षीय सुजाता गोपाळ तर अवघ्या चार वर्षीय सुरेंद्र बर्‍हाटे या चार वर्षीय चिमुकल्याने सहभाग नोंदवला. या प्रोजेक्टसाठी ओबिनॉल फाउंडेशन, बियाणी ग्रुप तसेच साई जीवन सुपर शॉपी यांनी अर्थसहाय्य केले तर सुवर्ण सायकलचे दलजीत चौधरी यांनी पाच सायकल व पाच हेल्मेट प्रायोजित केले महादेव डिस्ट्रीब्युटरचे पंकज कृपलानी यांनी पाच इलेक्ट्रिकल केटल्स व एक मोठा ज्युसर प्रायोजित केला. सर्व बक्षिसे लकी ड्रॉ मार्फत देण्यात आली होती.


हे ठरले स्पर्धेतील विजेते
चिन्मय तायडे, खेमचंद्र झोपे, वरद फडके जिग्नेश ढाके व देव जोशी यांना इलेक्ट्रिकल केटल्स मिळाले तर अंश ओझा ज्युसरल विजेता ठरला.यसुजाता गोपाळ, निलेश महाजन, हर्षल चौधरी, भार्गवी उंबरकर, रुद्र पाटील यांना सायकलचे हेल्मेट लकी ड्रॉ मार्फत मिळाले. वैभव शुक्ला, ओजस शर्मा,चेतन फडणीस,आदित्य शहा आणि श्रेयस अत्तरदे यांना सायकल लकी ड्रॉ मार्फत मिळाल्या. याचबरोबर भुसावळ शहरातील सायकलस्वारांनी मागील काळात नाशिक ते अयोध्या सुमारे एक हजार 400 किलोमीटर सायकल स्वारी केल्याने कामिनी धांडे, विद्याधर इंगळे, मधुकर इंगळे, समीर चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

यांची प्रमुख उपस्थिती
सायकल रॅलीचे उद्घाटन झेंडा दाखवून व सर्व विजेत्यांना बक्षिसे रजनी सावकारे, संगीता बियाणी, अश्विन परदेशी, दलजीत चौधरी यांच्याहस्ते बक्षिसे देण्यात आली. सूत्रसंचालन सुयश न्याती तर आभार संदीप जोशी यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन आशिष पटेल, को.चेअरमन सचिन अग्रवाल, अध्यक्ष विशाल शहा, सचिव अनिल सहानी तसेच सर्व रोटरी सदस्यांनी परिश्रम घेतली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !