भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात उद्या शेतकरी कार्यशाळा
भुसावळ (17 फेब्रुवारी 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात मंगळवार, 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता शेतकरी कार्यशाळा होत आहे. उद्घाटन भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांच्याहस्ते होईल.
अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य तसेच प्राचार्य फोरम चे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.पी.फालक असतील. या कार्यशाळेत पहिल्या सत्रात माजी कृषी अधिकारी ए.डी.पाटील हे कृषी क्षेत्रातील शासकीय योजनांची माहिती या विषयावर, नारायण तोताराम पाचपांडे हे ‘आधुनिक शेती पद्धती’ या विषयावर तर मनोहर राजाराम पवार हे ‘सेंद्रिय शेती – काळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शन करतील. शेतकरी बंधूंना या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

