श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा


यावल (19 फेब्रुवारी 2025) : यावल तालुक्यातील चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी 15 वर्षानंतर एकत्र आले व मोठ्या उत्साहात शाळेच्या वर्गात पुन्हा हजेरी देत स्नेह मेळावा घेण्यात आला. गुरूजनांचा सन्मान करीत शालेय आठवणींना उजाळा देण्यात आला.

जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
चुंचाळे गावातील श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक विद्यालयाच्या 2009-2010 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा झाला. मेळाव्यात एकूण 35 माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. नंदुरबार येथे शैक्षणिक संस्थेत कार्यरत असलेल्या भूषण राजपूत, इंटरनॅशनल उद्योजक गिरीश नेवे, पुणे येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असलेले अवतारसिंग राजपूत, यावल पोलीस स्टेशनला होमगार्ड सेवेत असलेले हुसेन तडवी व किशोर धनगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुरत ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या रवीना राजपूत, सुमित राजपूत यांनी आपल्या गावात आमच्या घरांमध्ये शाळा सुरू झाली व ती आज बहरली, असा आनंद व्यक्त केला. श्री समर्थ सद्गुरु वासुदेव बाबांनी गावामध्ये इयत्ता पाचवी ते बारावी सुरू केल्याने गोरगरीबांचे पोरं शिक्षण घेत असल्याने आम्ही या पदावर जाऊ शकलो व आम्हाला हे व्यासपीठ मिळालं अशा भावना व्यक्त केल्या.


शिक्षकांनी व्यक्त केले मनोगत
वस्तीगृहात राहत असलेले नरेंद्र सपकाळे, शेखर तडवी, हर्षा पाटील, दिनेश पाटील, सागर धनगर, जावेद तडवी, राहुल नाथ, सविता सोनवणे, पल्लवी सोनवणे, सलमा तडवी, फकीरा तडवी, सुनीता मनोरे, शरीफा तडवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिक्षकांमधून डी.बी.मोरे, एस.बी.गोसावी, एम.आर.चौधरी, प्रशांत सोनवणे, सुधीर चौधरी यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे वाय.वाय.पाटील होते. सूत्रसंचालन रब्बील तडवी तर प्रास्ताविक हर्षा पाटील व आभार शीतल कोळी यांनी मानले. यशस्वीतेसाठी रवींद्र पाटील, अरुण कोळी, कैलास धनगर, अमोल बोरसे, व शिग्र अधीक्षक सी.टी.चौधरी यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !