विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा : डॉ.अनिल झोपे


भुसावळ (19 फेब्रुवारी 2025) :आगामी काळामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणे गरजेचे असून विद्यार्थ्यांच्या पायाभूत क्षमता यामध्ये वाचन, लेखन व गणन या क्रिया प्रत्येकामध्ये वृद्धिंगत झाल्या पाहिजेत. पायाभूत चाचणी व असर यामधील तफावत ही विचार करण्यासारखी असल्याचे मत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील पुंडलिक गणपत बर्‍हाटे विद्यालयामध्ये शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 चा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. डॉ.झोपे हे मार्गदर्शन करताना बोलत होते.

शिक्षण क्षेत्राला नवी दिशा
डॉ.झोपे म्हणाले की, भारताच्या शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवण्यासाठी केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. हे धोरण 2020 मध्ये लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा परिष्कृत आवृत्ती असून आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्य विकास, आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणार आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात नवी दिशा निश्चित मिळेल. प्रशिक्षणाला जिल्हा समन्वयक तथा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे जेष्ठ अधिव्याख्याता डॉ.सी.डी.साळुंखे, डॉ.कविता चव्हाण उपस्थित होत्या.


गुणवत्तापूर्वक शिक्षक प्रशिक्षण
डॉ.सी.डी.साळुंखे म्हणाले की, तंत्रज्ञान-सक्षम शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण, बहुभाषिक शिक्षण, शिक्षण व संशोधनाचा समन्वय, गुणवत्तापूर्ण शिक्षक प्रशिक्षण, समावेशक शिक्षण यांचा समावेश करण्यात आला आहे. या धोरणामुळे भारतीय शिक्षण प्रणाली अधिक नाविन्यपूर्ण, व्यावसायीक, कौशल्ययुक्त आणि विद्यार्थ्यांपर्यंत सहज पोहोचणारी बनेल. शिक्षण क्षेत्रातील ही सुधारणा विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवेल आणि देशाच्या एकूण विकासाला गती देईल, असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले. सूत्रसंचालन अशोक तायडे तर आभार निलेश पाटील यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !