भुसावळात ज्येष्ठ नागरिकांच्या तहसीलदारांनी जाणल्या समस्या
भुसावळ (20 फेब्रुवारी 2025) : शहरातील तहसील कार्यालयात तहसीलदार नीता लबडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी आजी, माजी सैनिक, वीर नारी, वीर माता, वीर पिता, विधवा पत्नी यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी व तालुकास्तरीय समिती स्थापन तयार करण्याच्या उद्देशाने तहसीलदार कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली.
कल्याणकारी योजनांची दिली माहिती
तहसील कार्यालयात झालेल्या या बैठकीत आलेल्या आजी-माजी सैनिक यांचा तहसीलदार लबडे यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. उपस्थितांचा परिचय करून संवाद साधला. जिल्हा सैनिक बोर्ड जळगावमधील अधिकारी यांनी विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. जिल्हा सैनिक कल्याण निधी संकलन पूर्ण केल्याने महसूल सहायकांचे तहसीलदार यांनी कौतुक केले. ही बैठक आजी-माजी सैनिक यांच्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली.

माजी सैनिकांकडून वरणगाव येथे आजी-माजी सैनिकासाठी भवन बांधणार असल्याने त्यांनी जागेची मागणी केली. तहसील कार्यालय व अन्य ठिकाणच्या काही समस्या असल्यास त्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन तहसीलदार नीता लबडे यांनी यावेळी उपस्थितांना दिले.
