वरणगावातील चित्रकला स्पर्धेत जिंकरा खान प्रथम

हे तर हिंदू मुस्लिम ऐक्याचे लक्षण : सहा.निरीक्षक जनार्दन खंडेराव


वरणगाव (20 फेब्रुवारी 2025) : शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा झाली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे अत्यंत सुरेख असे चित्र जिंकरा अजमाल खानने पटकावला तर दुसरा क्रमांक गौरी दीपक माळी व तिसरा क्रमांक पायल योगेश माळीने पटकावला.

असंख्य विद्यार्थिनींचा सहभाग
चित्रकला महा स्पर्धचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष सुनील काळे, सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री योगेश माळी यांनी केले होते. या स्पर्धेमध्ये वरणगाव शहरातील असंख्य विद्यार्थिनींनी भाग घेतला. ही चित्रकला रंगभरण स्पर्धा संपूर्ण शहरात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आकर्षण स्पर्धा ठरली. बक्षीस वितरण वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव, अल्लाउद्दीन शेठ, वाय.आर.पाटील, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, मराठा समाजाचे अध्यक्ष दीपक मराठे, नंदू जोशी, दत्तात्रय सूर्यवंशी, रमेश पालवे, अनिल वंजारी, भाऊलाल टिंटोरे, गोविंदराव गावंडे यांच्याहस्ते करण्यात आले.


महाराजांचे विचार अंगारावेत
सहा.पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे कुण्या एका जातीचे नव्हते तर ते अठरापगड जातीला बरोबर घेऊन त्यांनी आदर्श राज्य व स्वराज्यसुद्धा निर्माण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक मुस्लिम समाजाचे होते. महाराजांचे विचार आजच्या तरुणांनी अंगीकारले तर आपल्या वरणगाव शहरात सामाजिक सलोखा चांगल्या पद्धतीत निर्माण होईल. या चित्रकला रंगभरण महास्पर्धेत एका मुस्लिम समाजातील चिमुकलीने महाराजांचे उभेऊभ तैलचित्र साकारले असून हेच ऐक्याचे लक्षण आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी मुस्लिमभाई अन्सारी, पझल शेख, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नाना चौधरी, मयूर शेळके, पंकज नाना चौधरी, डॉ.इद्रिस कृष्णा महाजन, शंकर अण्णा पवार, कृष्णा सोनगीरकर, श्रेयस वंजारी, चेतन चौधरी यांच्यासह संकेश्वर उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !