भुसावळ शहरात शिवजयंतीनिमित्त उद्या बैठक
भुसावळ (21 फेब्रुवारी 2025) : छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती 17 मार्च रोजी शहरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या संदर्भात नियोजन करण्यासाठी महत्वपूर्ण बैठक शहरातील व्यंकटेश बालाजी मंदिरात शनिवार, 22 रोजी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आली आहे. गतवर्षी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली व विविध उपक्रम राबवण्यात आले होते.
यंदादेखील त्यादृष्टीने नियोजन असल्याने गणेशोत्सव तसेच दुर्गोत्सव साजरा करणार्या पदाधिकारी, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य करणार्या पदाधिकार्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांनी केले आहे.

