भुसावळ शहरात उद्या दिंडीचे स्वागत व कीर्तन
भुसावळ (21 फेब्रुवारी 2025) : पाचोरा तालुक्यातील मोहाडी येथून श्री क्षेत्र मेहुण येथे निघालेल्या श्री संत मुक्ताई पायी दिंडीचे शहरातील खडका रोडवरील गुंजाळ कॉलनीतील सामाजिक कार्यकर्ते सारंगधर पाटील यांच्या निवासस्थानी शनिवारी आगमन होणार आहे.
यानिमित्त दुपारी 12 ते अडीचदरम्यान कीर्तनही होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी तसेच पादुका दर्शनासह कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री फाऊंडेशनचे अध्यक्ष सारंगधर महादेव पाटील (छोटू भाऊ) व भाजपा युवा मोर्चा खजिनदार मनीष सारंगधर पाटील यांनी केले आहे.

