स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार करणार्या नराधमाला अखेर अटक
Dattatray Gade Arrested: पुणे (28 फेब्रुवारी 2025) : स्वारगेट स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार करणारी व समाजमन सुन्न करणारी घटना अलीकडेच घडली होती. या घटनेतील आरोपी पसार झाल्यानंतर त्यास अटक करण्यात यंत्रणेला यश आले. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून आरोपी दत्तात्रय गाडे (37) यास अटक करण्यात आली. आरोपीविरोधात अनेक गुन्हे दाखल असून तो हिस्ट्रीशीटर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते. तसेच गावकर्यांनी त्याला गावात पहिल्याचे समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी गुनाट या गावातच त्याचा शोध घेण्याची ठरवले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला.गुनाट गावात आणि आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध सुरू झाला. ड्रोनच्या माध्यमातून उसाच्या परिसरात पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र सायंकाळपर्यंत तो सापडला नव्हता. अखेर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो एका शेतात पोलिसांना सापडला.



अत्याचारानंतर आरोपी पसार
बसच्या प्रतीक्षेत असलेल्या 26 वर्षीय तरुणीला आरोपीने ताई तिकडे बस लागते म्हणत शिवशाही बसमध्ये नेत तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला होता. तरुणीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर ही घटना समोर आल्यानंतर आरोपीचा कसून शोध सुरू करण्यात आला. दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पुणे पोलिसांची 13 पथके रवाना करण्यात आली होती.