प्रवाशांनो लक्ष द्या : नंदुरबार पॅसेंजरसह सुरत एक्स्प्रेस आजपासून तीन दिवस उशिराने धावणार !

भुसावळ विभागात आजपासून वाहतूक व पॉवर ब्लॉक : प्रवाशांची गैरसोय


भुसावळ (1 मार्च 2025) : भुसावळ विभागातील जळगाव-भादली स्थानकांदरम्यान (किमी 423/17-19) चार पदरी रेल्वे उड्डाणपुलाच्या 58 मीटर गर्डर लाँचिंगसाठी विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. हा उड्डाणपूल तरसोद-फागणे महामार्गाच्या चौपदरीकरण प्रकल्पांतर्गत (किमी 422.700 ते किमी 510.00) अंतर्गत बांधला जात आहे. यासाठी भुसावळ विभागात अप व डाऊन लाईन तसेच तिसरी व चौथी लाईन यांवर विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

आज या गाड्या उशिराने धावणार
गाडी क्रमांक 12520 अगरतला-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात 01.15 तास, गाडी क्रमांक 12335 भागलपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात 45 मिनिटे, गाडी क्रमांक 15018 गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात 45 मिनिट, गाडी क्रमांक 19046 छपरा-सुरत एक्सप्रेस विभागात 30 मिनिटे तर गाडी क्रमांक 59076 भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशीराने भुसावळ स्थानकातून सुटणार आहे.


2 रोजी या गाड्या उशिराने धावणार
गाडी क्रमांक 15018 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात 45 मिनिटे, गाडी क्रमांक 19046 छपरा-सुरत एक्सप्रेस विभागात 30 मिनिटे, गाडी क्रमांक 12742 पटना-वास्को दि गामा एक्सप्रेस विभागात 45 मिनिटे, गाडी क्रमांक 59076 भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशीराने भुसावळ स्थानकातून सुटेल.

3 रोजी या गाड्या उशिराने धावणार
गाडी क्रमांक 22122 लखनौ-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात एक तास 15 मिनिटे, गाडी क्रमांक 15018 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात 45 मिनिटे, गाडी क्रमांक 19046 छपरा-सुरत एक्सप्रेस विभागात 45 मिनिटे, गाडी क्रमांक 22311 भागलपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात 45 मिनिटे तर गाडी क्रमांक 59076 भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने भुसावळ स्थानकातून सुटेल.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !