करुणा मुंडे यांचा धक्कादायक दावा ; धनंजय मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला?


मुंबई (2 मार्च 2025) : धनंजय मुंडे यांच्या संदर्भात करुणा मुंडे यांनी धक्कादायक दावा केला आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंडे यांनी राजीनामा दिला असून 3 रोजी त्या संदर्भातील घोषणा होणार असल्याचे फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याला अटक झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांची राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी वाढली आहे. विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह महायुतीच्या नेत्यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर राजकीय दबाव देखील वाढत आहे. त्यात आता करुणा मुंडे यांनी यासंदर्भात मोठा दावा केला आहे. धनंजय मुंडे यांनी आधीच अजित पवार यांच्याकडे राजीनामा दिला असून त्याची अधिकृत घोषणा 3 मार्च रोजी होणार असल्याचे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या की, मला शंभर टक्के माहिती मिळाली आहे की, दोन दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांच्याकडून राजीनामा लिहून घेतलेला आहे. उद्या शंभर टक्के राजीनामा होणार आहे. वाल्मीक कराड दोशी निघाला तर मी राजीनामा देणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी आधीच सांगितलं होते. त्यामुळे आता त्यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसल्याचे करुणा मुंडे यांनी म्हटले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधीच अजित पवार धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची घोषणा करतील, अशी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !