कोथळी यात्रोत्सवात भाजपा महिला पदाधिकार्‍यांच्या मुलीची छेडखानी : तीन आरोपींना बेड्या


BJP women office bearer’s daughter molested during Kothali Yatrotsav : Three accused arrested भुसावळ (3 मार्च 2025) : कोथळी, ता.मुक्ताईनगर येथील यात्रोत्सवात काही टवाळखोर तरुणांनी अल्पवयीन मुलींची तसेच भाजपा महिला पदाधिकार्‍यांच्या मुलीची छेड काढल्यानंतर या प्रकरणी दोषी आरोपींविरोधात गुन्हा दाखल होवून त्यांच्यावर तत्काळ अटकेची कारवाई करावी या मागणीसाठी मंत्री रक्षा खडसे रविवारी सकाळी आक्रमक पवित्रा घेतला होता. पोलिसांनी याप्रकरणी सात संशयीताविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तीन संशयीतांना अटक केली आहे तर अन्य एक संशयीत अल्पवयीन असल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले.

मोबाईल तपासल्याच्या वादातून सुरक्षा रक्षकासोबत वाद
कोथळी, ता.मुक्ताईनगर येथे यात्रोत्सव सुरू असून गावातील लोकप्रतिनिधींच्या मुलीसह तिच्या काही अल्पवयीन मैत्रिणी 28 मार्च रोजी रात्री नऊ वाजता पाळण्यांवर बसण्यासाठी गेल्यानंतर गावातील काही टवाळखोरांनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी संशयीत व्हिडिओ शुटींग करीत असल्याचा संशय आल्यानंतर पोलीस शिपाई नरेंद्र बंडू चोपडे (36, निमखेडी बु.॥, ता.मुक्ताईनगर) यांनी मोबाईल तपासल्यानंतर संशयीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवत कर्तव्यात अडथळा आणला. याप्रकरणी चोपडे यांच्या फिर्यादीवरून पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.




आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी मंत्री खडसे आक्रमक
यात्रोत्सवात गेलेल्या अल्पवयीन मुलींसोबत अश्लील वर्तन करीत छेडखानी केल्याप्रकरणी दोषींवर कारवाई करून अटक करण्याच्या मागणीसाठी मंत्री रक्षा खडसे रविवारी सकाळी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात पीडीत मुलींसह दाखल झाल्या. यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेत लोकप्रतिनिधींच्या मुली जेथे सुरक्षित नाहीत तेथे सर्वसामान्यांचे काय म्हणत संताप व्यक्त केला. हा प्रकार आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकू, असे त्यांनी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांना सांगितले. यावेळी यात्रोत्सवात गेलेल्या मुलींनी घडला प्रकार कथन केला तर शाळेत जाणार्‍या काही मुलींना दररोज रोडरोमिओ कशा पद्धत्तीने त्रास देतात याचा लेखाजोखा सांगितला.

सात संशयीतांविरोधात गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेडखानी केल्याप्रकरणी अल्पवयीन पीडीतेच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित सात संशयीतांविरोधात विनयभंग, पोस्को तसेच आय.टी.अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी रविवारी रात्री उशिरापर्यंत अनिकेत भोई, किरण माळी, अनुज पाटील यांना अटक केली तर एक अल्पवयीनाला ताब्यात घेतले. दरम्यान, या गुन्ह्यातील चेतन भोई पसार संशयीतांच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !