विवाहबाह्य संबध असलेल्या महिलांवर तो ठेवायचा पाळत ; स्वारगेट बसस्थानकात अत्याचार करणार्या आरोपीचे अनेक धक्कादायक कारणामे समोर…!
पुणे (3 मार्च 2025) : स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार करणार्या नराधम दत्ता गाडेचे पोलीस चौकशीत अनेक कारनामे समोर आले आहेत. आरोपीने अनेक महिला आणि युवतींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती आहे. शिरुर परिसरात तो एका लॉजबाहेर बसून महिलांचे छुपे व्हिडिओ काढत असे आणि त्यांचा गैरफायदा घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
विवाहबाह्य संबध असलेल्या महिलांवर तो पाळत ठेवायचा. त्यांचे व्हिडिओ काढून त्यांना तो ब्लॅकमेल करायचा. त्यानंतर शारीरिक संबध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा, अशी माहिती सुत्रांनी दिली.

पीडित महिला आपली व कुटुंबियांची बदनामी नको म्हणून दत्ता गाडेच्या विरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हत्या. त्यामुळे गाडे यांचा असे गुन्हे करण्याचा आत्मविश्वास वाढला होता.
पीडीतेला दिली जीवे मारण्याची धमकी
स्वारगेट अत्याचार पीडीतेनं पोलिसांना दिलेला जबाबात गाडे याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे मी त्याला घाबरुन मला मारु नको, अशी विनंती केली होती, असे पीडितेने पोलिसांकडे नोंदविलेल्या जबाबात म्हटलं आहे. पोलिसांनी गाडे विरुद्ध पुरावे जमा करण्याचे काम सुरु केले आहे.




