जळगाव-भादली दरम्यान विशेष ब्लॉक : उद्यापासून चार दिवस 23 गाड्या विलंबाने धावणार !
भुसावळ विभागातील विविध स्थानकांवर थांबविण्यात येणार रेल्वेगाड्या
Special block between Jalgaon-Bhadli : 23 trains will run with delays for four days from tomorrow! भुसावळ (5 मार्च 2025) : जळगाव-भादली रेल्वे स्थानकादरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद-फागणे चारपदरी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी 58 मीटर गर्डर लाँच करण्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक रेल्वेने घेतला आहे. यासाठी भुसावळ विभागात अप व डाऊन लाईन तसेच तिसरी व चौथी लाईन यावरील रेल्वे वाहतूकीवर परिणाम होणार आहे. या ब्लॉकमुळे 6 ते 9 मार्च दरम्यान 23 रेल्वे गाड्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावणार आहे.
या गाड्या उशिराने धावणार
गुरुवार, 6 मार्च रोजी लखनउ-पुणे एक्सप्रेस एक तास 15 मिनिटे, गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 55 मिनिटे, छपरा-सुरत एक्सप्रेस व गुवाहाटी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 45 मिनिटे विविध स्थानकावर थांबविण्यात येतील. भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने भुसावळ स्थानकावरून सुटणार आहे. शुक्रवार, 7 रोजी गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात 55 मिनिटे थांबविण्यात येणार आहे. भागलपूर-सुरत एक्सप्रेस व दिब्रुगढ-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात 45 मिनिटे थांबविण्यात येणार आहे. भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशीराने भुसावळ स्थानक येथून सुटेल. 8 रोजी अगरतला-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात एक तास 15 मिनिटे थांबवण्यात येईल. गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस 55 मिनिटे तसेच छपरा-सुरत एक्सप्रेस, भागलपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात 45 मिनिटे थांबविण्यात येणार आहे. भुसावळ-नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने भुसावळ स्थानकावरून सुटेल.

9 मार्चपर्यंत गाड्या विलंबाने
9 मार्च रोजी बरेली-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात एक तास 15 मिनिटे थांबवण्यात येईल. गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस विभागात 55 मिनिटे थांबेल तर छपरा-सुरत एक्सप्रेस व पटना-वास्को दि गामा एक्सप्रेस विभागात 45 मिनिटे थांबवण्यात येईल तसेच भुसावळ -नंदुरबार पॅसेंजर आपल्या नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशीराने भुसावळ स्थानकावरून सुटेल. रेल्वेने 9 मार्चपर्यंत केलेल्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.






